जम्मू-काश्मीर: जमात-ए-इस्लामीच्या 50 ठिकाणांवर NIA चा छापा

crpf
crpf
Summary

भारत विरोधी कारवायांमध्ये (Anti-India Activities) सहभागी होणे आणि टेरर फंडिंगच्या संशयाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) एकाचवेळी ५० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापा टाकला आहे

नवी दिल्ली- भारत विरोधी कारवायांमध्ये (Anti-India Activities) सहभागी होणे आणि टेरर फंडिंगच्या संशयाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) एकाचवेळी ५० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापा टाकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काश्मीरसह जम्मूच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमात-ए-इस्लामीशी संबंधित संस्था आणि एनजीओ कार्यालयांवर आणि घरावर रविवारी छापा टाकण्यात आली. (Jammu-Kashmir India Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जवळपास ५ वाजता राष्ट्रीय तपास एजेन्सीने जम्मू-काश्मीर पोलीस आणि अर्धसैनिक बलांच्या जवानांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या घरांवर छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, डिजिटल पुराव्यांसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.

crpf
Corona Update: कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; 491 जणांचा मृत्यू

एनआयएने काही महिन्यांपूर्वी जमात-ए-इस्लामीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या छाप्यामध्ये एनआयएचे ५ एसपी आणि १५० च्या जवळपास अधिकारी आहेत. किश्तवाड, डोडा, रामबन, राजौरी, बारामुल्ला, पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, बडगाम आणि श्रीनगर या ठिकाणी छापेमारी सुरु आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण पुरावे आणि कागदपत्रे मिळाले आहेत. एनआयए यापुढील तपास करणार आहे. शिवाय दहशतवाद्यांसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी काही लोकांची साक्ष नोंदली जाणार आहे.

प्रमुख संदिग्ध आरोपींच्या घरावर छापेमारी

१. गुल मोहम्मद वार- जमात-ए-इस्लामी संघटनेचा जिल्हा प्रमुख असलेला हा व्यक्ती गंदेरबलचा रहिवाशी आहे

२. अब्दुल हमीद भट- गमचीपुर भागातील रहिवाशी आहे

३. ज़हूर अहमद रेशी- जमात-ए-इस्लामीचा सदस्य आणि फलाह-ए-आम ट्रस्टमध्ये शिक्षक आहे. सफापोरामध्ये एका दुकानाचा मालक आहे.

४. मेराजुद्दीन रेशी- मादी दहशतवादी असून सध्या एक दुकान चालवतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com