NSE Phone Tapping Case : संजय पांडे आता सीबीआय कोठडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Stock Exchange NSE Phone Tapping Case Sanjay Pandey now in CBI custody delhi

NSE Phone Tapping Case : संजय पांडे आता सीबीआय कोठडीत

नवी दिल्ली : ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (एनएसई) फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. पांडे हे याआधी ‘ईडी’च्या कोठडीमध्ये होते. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली. पांडे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.