tiger
sakal
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटकांनी उत्तराखंडमधील प्रसिद्ध जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला पसंती दिली आहे. ३१ डिसेंबर पासूनच कॉर्बेटमधील ढिकाला, बिजरानी, झिरना, दुर्गादेवी आणि ढेला हे सर्व प्रमुख झोन पर्यटकांनी पूर्णपणे गजबजले आहेत. शहरांमधील गोंगाट, गर्दी आणि प्रदूषण टाळून शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्ष साजरे करण्याच्या इच्छेने पर्यटकांनी कॉर्बेटमध्ये मोठी गर्दी केली आहे.