Naveen Patnaik : ‘राज्य सरकार स्वतःची जबाबदारी झटकत आहे’; नवीन पटनाईक यांची सरकारवर जहाल टीका
Odisha Rath Yatra : ओडिशातील रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाल्याने या आध्यात्मिक सोहळ्यावर शोककळा पसरली आहे. विरोधकांनी भाजप सरकारवर जबाबदारी झटकण्याचा आरोप केला आहे.
भुवनेश्वर : ओडिशातील रथयात्रेमध्ये रविवारी सकळी चेंगराचेंगरी होऊन तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ओडिशातील भाजप सरकारवर राज्यातील विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.