
प्रचारा दरम्यान राबियाने तिच्या लग्नाबाबत चर्चा केली. वडिलांचा विजय होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले.
Punjab: नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीनी घातली लग्नासाठी अट; म्हणाली...
पंजाब: काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची मुलगी राबिया सिद्धू (Rabia Sidhu) नेहमीच इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते. आता ही राबिया सिद्धू प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. सध्या पंजाब निवडणूकीच्या (Punjab Assembly Election 2022) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच नवज्योत सिंह सिद्धूंच्या मुलीच्या वक्तव्याने चर्चेला उधान आले आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात राबिया आपल्या वडिलांच्या बाजूने घरोघरी प्रचार करत आहे. मजिठिया निवडणुकीत अकाली दल जर जिंकला तर ते इथे ड्रग्जचा धंदा पसरवतील असा निशाणा तिने बिक्रम सिंह मजिठिया यांना लगावला. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबमध्ये तगडी टक्कर देत आहेत.
चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू अस्वस्थ झाले आहेत. सिद्धू वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. निवडणूक प्रचाराची धुरा त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू आणि मुलगी राबिया सांभाळत आहेत. प्रचारा दरम्यान राबियाने तिच्या लग्नाबाबत चर्चा केली. वडिलांचा विजय होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले. एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर राबियाने हे उत्तर दिले आहे.
हेही वाचा: "पंजाबमध्ये जनतेचे सरकार स्थापन होईल" : चरणजीत सिंह चन्नी
राबिया म्हणाली, पंजाबमध्ये सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे. यामुळे अनेक तरूण रोजगारासाठी बाहेर पडत आहेत. माझ्या वडिलांचे पंजाबवर खूप प्रेम आहे. त्यांनी पंजाबची भरभराट बघायची आहे. पंजाबप्रती त्यांचा विचार खूप प्रामाणिक आहे. पंजाब मॉडेलसाठी त्यांनी बरीच वर्षे घालवली असेही ती म्हणाली.
Web Title: Navjot Singh Sidhu Daughter Rabia Condition For Marriage Punjab Assembly Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..