
"ज्यामुळे तुमची चूल पेटली.."; सभेआधी राणांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं!
मुंबईत मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Chief Minister Uddhav Thackeray) घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa Row in Maharashtra) करण्याच्या मागणीमुळे जेलमध्ये जावं लागणारं राणा दाम्पत्य सध्या दिल्लीमध्ये आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी आता दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) तोफ डागली आहे. दिल्लीतल्या कनॉट प्लेस परिसरातल्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य आज महाआरती करणार आहेत.
दरम्यान, दिल्लीतूनच नवनीत राणांनी (MP Navneet Rana) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं हिंदुत्व हवं, अशी टिपण्णी राणा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी केली होती. त्या संदर्भाने ठाकरेंवर टीका करताना राणा म्हणाल्या, "इतकी वर्षे त्यांच्या घरातली चूल ज्यामुळे पेटली, आज तेच हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलत आहेत. आजपर्यंत ज्यांच्या आशिर्वादाने, मोदींचा आशिर्वाद घेऊन शिवसेना २०१४, २०१९ मध्ये निवडून आली. पण आज खुर्चीच्या हव्यासापोटी शिवसेना त्यांच्या विरोधात उभी आहे हे सगळ्या देशाने पाहिलं आहे."
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राणांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्या निवडून आल्या होत्या. आता त्यांच्या हनुमान चालिसेबद्दलच्या भूमिकेमुळे, तसंच दिल्ली दरबारी धाव घेण्यामुळे राणा दाम्पत्य आता भाजपाच्या वाटेवर आहे की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Web Title: Navneet And Ravi Rana Uddhav Thackeray Hanuman Chalisa Row Delhi Hindutva
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..