उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच राणा दाम्पत्याची महाआरती, दिल्लीतून घोषणा

Navneet Rana, Ravi Rana Marathi News | Uddhav Thackeray Sabha
Navneet Rana, Ravi Rana Marathi News | Uddhav Thackeray Sabhasakal

राणा दाम्पत्याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे सरकार टीका करायला सुरुवात झाली आहे. राणांनी दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांच्याकडे यासंदर्भात तक्रार देखील केल्याचं कळतंय. महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू असून महिलांसाठी अराजकता पसरल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं. (Navneet Rana Alleges CM Thackeary over Hanuman Chalisa Row)

येत्या १४ मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईच्या बीकेसीत जाहीर सभा घेणार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणा दाम्पत्य दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांनी आणलेलं संकट घालवण्यासाठी आम्ही संकट मोचन हनुमानाची पूजा करणार आहोत, असं राणांनी म्हटलंय. (Navneet Rana Latest News)

१४ तारखेला सकाळी ९ वाजता दिल्लीच्या कनॉट प्लेसवर ही महाआरती पार पडणार आहे.

मुंबईतील खारमध्ये राणा दाम्पत्याचं घर आहे. त्याला पालिकेने नोटीस पाठवून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी पालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामाचं निरीक्षण करण्यासाठी दाखल होणार आहेत. मात्र मुंबईती फ्लॅट अनधिकृत नसल्याचं राणांनी स्पष्ट केलं आहे. याउल मुंबईत अनिल परब यांचे १५ फ्लॅट्स असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ठाकरे कुटुंबीय आणि संजय राऊत यांनी मुंबईत मनपाच्या जीवावर बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप राणांनी केलाय.

Navneet Rana, Ravi Rana Marathi News | Uddhav Thackeray Sabha
कोर्टाच्या नोटीसीनंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा

  • रामाचं नाव महाराष्ट्रात घेतल्यानंतर आमच्याविरोधात राजद्रोह दाखल झाला

  • २३ तारखेला नवनीत राणांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

  • संजय पांडेंनी मुख्यमंत्र्यांना खूष करण्यासाठी महिला खासदाराच्या घरात पोलीस पाठवले

  • २ दिवस लॉक अप आणि १२ दिवस कोठडीत ठेवलं

  • बीएमसीत भ्रष्टाचार करून कोट्यवधींच्या मालमत्ता शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांनी कमावली

  • आम्ही फ्लॅट घेतला त्यावेळी शिवसेनेची सत्ता होती. त्या वेळीच आम्ही फ्लॅट विकत घेतला.

  • लिलावती रुग्णालयाला तुम्ही नोटीस देत आहात...कोणत्या आधारे देत आहात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com