

durga puja dj ban Navratra
esakal
आगामी दुर्गा पूजा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी धनबाद जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा उपायुक्त आदित्य रंजन आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत विविध निर्णय घेण्यात आले.
यामध्ये दुर्गा पूजा मंडप तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील अफवा आणि आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर मॉनिटरिंग सेल सक्रिय करण्यात येणार आहे. पूजा मंडप उभारण्यासाठी अग्निशामक, बांधकाम आणि विद्युत विभागाचे NOC घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.