नवादा (बिहार) : नवादा जिल्ह्यातील एका दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर (Dalit Girl) सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लखनऊहून वैद्यकीय उपचार घेऊन परतत असताना या पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. नवादा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) जलद कारवाई करत फक्त १८ तासांच्या आत सर्व चार आरोपींना अटक केली आहे.