
रायपूर : छत्तीसगडमध्ये एकीकडे नक्षलवाद्यांच्या गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जात असताना राज्यातील नक्षलप्रभावित भागात पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत. राज्यातील गेली अनेक वर्षे नक्षलवादाचा सामना करणाऱ्या विजापूर जिल्ह्यातील तिमेनार हे गाव सुमारे सात दशकांनंतर प्रथमच विजेने उजळले आहे. पायाभूत सुविधांअभावी अंधारात चाचपडणारे तिमेनार आता विकासाची वाट चालणार आहे.