NCERT Political Science Book: बाबरी, गुजरात दंगल ते हिंदुत्वाचं राजकारण.. NCERTच्या पुस्तकातून काय काय वगळलं? नवीन अधिवेशनापूर्वी मोठा बदल

NCERT Political Science Book: गेल्या काही वर्षांत NCERT ने अनेक संवेदनशील विषय एकतर पुस्तकांमधून बदलले आहेत किंवा काढून टाकले आहेत.
NCERT Political Science Book
NCERT Political Science BookEsakal

NCERT Political Science Book: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT) ने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक बदल केले आहेत. बाबरी मशीद, हिंदुत्वाचे राजकारण, 2002 ची गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकांशी संबंधित काही संदर्भ पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. हे पुस्तक शैक्षणिक सत्र 2024-25 पासून लागू केले जाईल. अलीकडच्या काळात अनेक संवेदनशील विषय पुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत.

NCERT ने गुरुवारी (4 एप्रिल) आपल्या वेबसाइटवर हे बदल सार्वजनिक केले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न शाळांमध्ये NCERT पुस्तके शिकवली जातात. देशात या मंडळाची मान्यता असलेल्या शाळांची संख्या सुमारे 30 हजार आहे. CBSE बोर्डाच्या शाळा भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात आहेत.

NCERT Political Science Book
Sakal Podcast: जेवण बनवणारा यंत्रमानव बाजारात ते करण जोहरनं बॉलिवूडवाल्यांनाच झापलं

अयोध्येवर काय लिहिले होते?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 'इंडियन पॉलिटिक्स: न्यू चॅप्टर' या राज्यशास्त्राच्या आठव्या अध्यायात 'अयोध्या विध्वंस'चा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. प्रकरणातील 'रामजन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या विध्वंसाचा वारसा राजकीय जमवाजमवीचे स्वरूप काय आहे?' ते बदलून 'रामजन्मभूमी आंदोलनाचा वारसा काय आहे?' केले आहे. प्रश्नांची उत्तरे नवीन बदलांशी जोडली जावीत म्हणून असे करण्यात आल्याचे एनसीईआरटीचे म्हणणे आहे.

NCERT Political Science Book
Union Ministers : खासदारकी संपूनही मंत्रिपद कायम ; केंद्रातील सात मंत्र्यांना पूर्वीच्या कायदेशीर अभिप्रायाचा आधार

गुजरात दंगलीसह हे विषय बदलण्यात आले

'इंडियन पॉलिटिक्स: न्यू चॅप्टर' या प्रकरणात बाबरी मशीद आणि 'हिंदुत्व राजकारण'चे संदर्भही काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात पुढे, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर कसे बांधले गेले हे देखील स्पष्ट केले आहे. 'डेमोक्रेटिक राइट्स' या शीर्षकाच्या पाचव्या प्रकरणात गुजरात दंगलीचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. एनसीईआरटीचे म्हणणे आहे की ही घटना 20 वर्षे जुनी आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तिचे निराकरण करण्यात आले आहे.

NCERT Political Science Book
Narayan Rane : सभागृहाचं सदस्यत्व नसतानाही सहा महिने मंत्रिपदावर खरंच राहता येतं का? कायदा काय सांगतो अन् प्रघात काय आहे?

ज्या ठिकाणी मुस्लीम समाजाचा उल्लेख पूर्वी केला होता, त्या काही जागाही बदलण्यात आल्या आहेत. पाचव्या अध्यायातच मुस्लिमांना विकासापासून 'वंचित' ठेवण्याचा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. मुस्लिमांबाबत, त्यांना कसे वेगळे मानले जाते हे पुस्तकात लिहिले आहे, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध द्वेष आणि हिंसाचाराचा पूर्वग्रह वाढतो. त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक आणि भेदभाव केला जातो, असे यापूर्वी येथे नमूद करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com