'इतकीच हौस असेल तर कोरोना मृत्यू दाखल्यावरही लावा फोटो'

'इतकीच हौस असेल तर कोरोना मृत्यू दाखल्यावरही लावा फोटो'

पाटणा : बिहार राज्यामध्ये कोरोनाचा कहर सध्या वाढतो आहे. अशात आता लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या फोटोवरुन विरोधी पक्ष मोदी सातत्याने निशाणा साधत आहेत. अशातच हिंदुस्थान आवाम पार्टीचे प्रमुख जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी देखील या प्रमाणपत्रांवरील फोटोवरुन मोदींवर टीका केली आहे. विशेष म्हणजे जीतनराम मांझी यांचा पक्ष सध्या एनडीएसोबत असून बिहारमध्ये सत्तेत आहे. जीतनराम मांझी यांनी याप्रकरणी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर जर फोटो लावायची इतकीच हौस असेल कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यू दाखल्यावर देखील फोटो लावला जायला हवं तरच हे न्यायसंगत होईल.  (NDA ally Jitan Ram Manjhi PM Modi pic should be on COVID19 patients death certificates)

'इतकीच हौस असेल तर कोरोना मृत्यू दाखल्यावरही लावा फोटो'
विमानात लग्न करण्याची हौस भोवणार; DGCAचे कारवाईचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, जीतनराम मांझी यांनी काल रविवारी कोरोनाचा दुसरा डोस घेतला. त्यावेळी त्यांना मिळालेल्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या असलेल्या फोटोवरुन त्यांनी हरकत घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र प्रसिद्ध करावे. राष्ट्रपती हे देशातील सर्व संवैधानिक संस्थांमधील एक आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांचा फोटो या ठिकाणी असायला हवा, अशी मागणी बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील सहभागी ‘हिंदुस्थानी अवामी मोर्चा’ (हम) या पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी सोमवारी केली.

मांझी यांनी नुकतीच लस घेतली. यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रात मोदी यांच्या छायाचित्रावरून त्यांनी आक्षेप घेतला. केवळ पंतप्रधानांचेच छायाचित्र का असा सवाल करून प्रमाणपत्रावर कायद्याने त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र प्रमाणपत्रावर असायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. म्हणजेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे छायाचित्र प्रसिद्ध करायला हवे, असे ते म्हणाले.

'इतकीच हौस असेल तर कोरोना मृत्यू दाखल्यावरही लावा फोटो'
समलैंगिक जोडप्यांच्या विवाह नोंदणीवरुन केंद्राची ताठर भूमिका?

भाजपचा विरोध

ते म्हणाले की, घटनात्मकदृष्ट्या प्रमुख या नात्याने प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचे छायाचित्र असायला हवे होते. पण तसे न करता पंतप्रधानांचे छायाचित्र छापले जात असेल तर मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र त्यावर असायला हवे. मांझी यांच्या मागणीला भाजपने विरोध केला आहे. पक्षाचे बिहारमधील उपाध्यक्ष राजीव रंजन म्हणाले की, लसीकरणाबद्दल संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे. पण मांझी मात्र छायाचित्रावरून राजकारण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com