NDA Meeting Video : मोदींच्या भाषणात एनडीए..एनडीए..! सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा; बैठकीत नेमकं काय बोलले?

''देशाच्या इतिहासात एवढं सक्षम अलायन्स यापूर्वी कधीची झालं नव्हतं. देश चालवायचा असेल तर सर्वांची सहमत आवश्यक असते. आता देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांचं मत विचारात घेऊन काम करणार आहोत. एनडीएला तीन दशकं झाली आहेत... मागच्या दहा वर्षात आम्ही एनडीएला सोबत घेऊन मोठं काम उभं केलं आहे.''
pm narendra modi
pm narendra modiesakal

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपसह सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित खासदार बैठकीसाठी उपस्थित होती. NDAच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय समितीच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडी सातत्याने एनडीए..एनडीए.. असे शब्द होते आणि कायम सोबत राहण्याचे बोल होते. मोदी म्हणाले की, एनडीएच्या नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये परिश्रम घेतले, त्यांचे खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. सद्य घडीला २२ राज्यांमध्ये एनडीएला सेवा करण्याची संधी जनतेने दिली आहे.

pm narendra modi
Nitish Kumar Video : ''इकडून तिकडे उड्या मारणाऱ्याला काहीच लाभ होत नाही'', NDAच्या बैठकीत नितीश कुमार नेमकं काय म्हणाले?

मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात एवढं सक्षम अलायन्स यापूर्वी कधीची झालं नव्हतं. देश चालवायचा असेल तर सर्वांची सहमत आवश्यक असते. आता देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांचं मत विचारात घेऊन काम करणार आहोत. एनडीएला तीन दशकं झाली आहेत... मागच्या दहा वर्षात आम्ही एनडीएला सोबत घेऊन मोठं काम उभं केलं आहे.

''हे जे एनडीएच लोक आहेत त्यांनी देशाला गुड गव्हर्नन्स दिलं आहे. आमच्या सगळ्यांच्या केंद्रबिंदू हा गरीबांचं कल्याण, आहे. देशाने आमचे दहा वर्षे बघितले आहेत, एनडीए सरकार पुढच्या दहा वर्षात विकास, गुड गव्हर्नन्स देणार असून

माझं वैयक्तिक स्वप्न सामान्य मानसाच्या जीवनामध्ये विशेष करुन मध्यमर्गीयांच्या जीवनात सरकारची दखल कमी होईल, असं काम करायचं आहे.''

मोदी पुढे म्हणाले की, सभागृहात कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी असले तरी माझ्यासाठी सगळे समान आहेत. लोकसभा असेल नाहीतर राज्यसभा, आमच्यासाठी सगळे समान असतील. त्यामुळेच ३० वर्षांपासून एनडीए अलायन्स मजबुतीने पुढे आलेलं आहे. त्यामुळे आम्ही जनतेचा विश्वास जिंकत आहोत. जहाँ कम वहाँ हम.. हे सगळ्या कार्यकर्त्यांनी साध्य केलं आहे. त्यामुळेच हा विजय झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com