'HowstheJaish'म्हणत महिला पत्रकाराची वादग्रस्त पोस्ट

वृत्तसंस्था
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

निधी सेठी हिने आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवली. ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले’ अशा आशयाचं ट्विट करत सेठी यांनी #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून #HowsTheJaish या हॅशटॅगकडे पाहिलं जात आहे.

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप असताना एनडीटीव्ही वाहिनीच्या एका महिला पत्रकाराने फेसुकवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे तिचे तातडीने निलंबन केले आहे. 

या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असताना एनडीटीव्हीच्या एका महिला पत्रकार निधी सेठी हिने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली. या महिला पत्रकाराने व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून हुतात्मा जवानांची खिल्ली उडवणारी संतापजनक पोस्ट केल्याचे समोर येताच एनडीटीव्हीने याची गंभीर दखल घेत संबंधित महिला पत्रकारावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. दोन आठवड्यांसाठी एनडीटीव्हीने त्या महिला पत्रकाराचं निलंबन केलं आहे.

निधी सेठी हिने आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवली. ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले’ अशा आशयाचं ट्विट करत सेठी यांनी #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून #HowsTheJaish या हॅशटॅगकडे पाहिलं जात आहे. या पोस्टचा जाब विचारत चांगलेच सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDTV strongly condemns Deputy News Editor Nidhi Sethi website post on Pulwama terror attack