esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज(बुधवार) पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज(बुधवार) पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काही सुचना केल्या. ते म्हणाले की, जिथं आवश्यक आहे त्या टिकाणी मायक्रो कंटेंनमेंट झोन तयार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये. त्यावर वेगानं काम झालं पाहिजे. देशांमधील नागरिकांमध्ये आपल्याला भीतीचे वातावरण निर्माण करायचं नाही. पण या परिस्थितीला सामोरं जाताना काही दक्षता बाळगाव्या लागतील. आपण गतवर्षी केलेल्या प्रयत्नाप्रमाणेच दुसऱ्या लाटेचाही सामना करायला हवा.  प्रत्येक राज्याचे वेगवेगळे प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्य इतर राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. ही चांगली बाब आहे. दुसऱ्या लाटेला सामोरं जाताना आता आपल्याला आधीक सक्रीय होण्याची आवश्यकता आहे.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे -

देशात उद्भवणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं. त्यासाठी जलद आणि निश्चयात्मक पावलं उचलावी लागतील.  

कोरोनाच्या लढाईमध्ये आज आपण इथपर्यंत पोहचलो आहे. पण त्यामुळे आलेला आत्मविश्वास अतिअत्मविश्वासामध्ये बदलू नये. तसेच जास्त तणाव घेणंही गरजेचं नाही. तसेच कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे.  

चाचणी, मागोवा घेणं आणि उपचार करणं... हे आणखी गंभीरपूर्ण करायला हवं. गतवर्षीप्रमाणेच यापुढेही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर शोधून तात्काळ RT-PCR चाचण्या घ्याव्यात.  

आपल्याला छोट्य शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवायला हवी. तसेच लहान शहरातील "रेफरल सिस्टम" आणि "रुग्णवाहिका नेटवर्क"वर विशेष लक्ष द्यावं लागेल.  

देशात वेगानं लसीकरण होत आहे. एका दिवसांत ३० लाख लोकांना लस देण्याचा विक्रमही केला आहे. पण यासोबतच कोरोना लसीचे डोस वायाचा जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.  

loading image
go to top