
NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख जाहीर
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अनिवार्य असलेली NEET PG परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्च रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET PG) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सहा MBBS विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर मोठा निर्णय जाहीर झाला आहे. (NEET PG Exams Postponed)
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती डी.वाय. यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि सूर्यकांत यांनी यासंबंधी सुनावणीला सुरुवात केली. यापूर्वी 7 फेब्रुवारीला सुनावणी होती. मात्र ती आधीच घेण्यात आली. यासंबंधी 25 जानेवारीला याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर संबंधित परीक्षा 6 ते 8 ते आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. (NEET PG Exams Latest Updates)
राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा १२ मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली. यामुळे २०२१ची केंद्राची प्रवेशफेरी सोमवारी, १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या प्रवेश फेऱ्या १५ मार्चपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे या प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जर विद्यार्थ्यांना पाहिजे त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर अनेक विद्यार्थी पुन्हा प्रवेश परीक्षा देतात आणि पुढील वर्षी प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.
१५० विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्य?त
१२ मार्च रोजी नीट पीजी २०२२ ची परीक्षा झाल्यास राज्यातील १५० विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वाधिक केरळमधील ३६०० विद्यार्थ्यांची इंटर्नशिप ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. गुजरातमधील ३०० विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै महिन्यात संपणार आहे. हाच मुद्दा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांचाही आहे. तरीही ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलली नाही तर विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाईल.अशी भीती विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत.
Web Title: Neet Exams Postponed By Supreme Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..