Paper Leak: पेपरफुटीची बुधवारपासून सुनावणी ;न्यायालयात १४ आरोपींविरोधात आरोप निश्चित

NEET Paper Leak Trial :‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील १४ आरोपींविरुद्ध दिल्ली न्यायालयाने आरोप निश्चित केले असून, २५ नोव्हेंबरपासून खटल्याची रोज सुनावणी होणार आहे.
Delhi court frames charges against 14 accused in the NEET paper leak case.

Delhi court frames charges against 14 accused in the NEET paper leak case

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील १४ आरोपींविरुद्ध दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी औपचारिकरीत्या आरोप निश्चित केले. त्यामुळे या प्रकरणाच्या खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाचा खटला बुधवारपासून (ता. २५) दररोज चालविण्यात येणार आहे.

विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले. यापूर्वी न्यायालयाने या आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांसह विविध गुन्ह्यांप्रकरणी प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे म्हटले होते.

Loading content, please wait...