
नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन सत्रात परीक्षा घेण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा (एनबीई) निर्णय मनमानी असल्याचा शेरा न्यायाधीश विक्रम नाथ, न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मारला.