नेहरू,वाजपेयी आणि चीन मुद्यावरून भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

नेहरू आणि वाजपेयींच्या 'मूर्खपणा'मुळे आम्ही भारतीयांनी तिबेट आणि तैवानला चीनचा भाग म्हणून स्वीकारला
MP Bjp
MP Bjpesakal

राज्यसभा खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी नरेंद्र मोदी याच्या वर टीका केली आहे. स्वामी म्हणाले की चीनने 'लडाखचा काही भाग काबीज केला आहे' आणि मोदी अजुन 'बेशुद्ध अवस्थेत' आहेत. भाजपच्या राज्यसभा खासदाराने बुधवारी एका ट्विटमध्ये माजी पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या वर ही टीका केली.

स्वामी म्हणाले की, नेहरू आणि वाजपेयींच्या 'मूर्खपणा'मुळे आम्ही भारतीयांनी तिबेट आणि तैवानला चीनचा भाग म्हणून स्वीकारले. स्वामी यांनी लिहिले की 'परंतु आता चीनने सामाईक सहमत एलएसी स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि लडाखचा काही भाग ताब्यात घेतला आहे आणि मोदी सांगत आहे की 'कोणीही भारतात कब्जा केला नाही' म्हणण्यात अडकले आहेत.

स्वामी यांनी म्हटल की निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे निवडणुका होतात हे चीनला कळले पाहिजे', असा टोला स्वामींनी लगावला. स्वामींच्या या ट्विटवर अनेक लोक विचारत आहेत की भारत तैवानला का मान्यता देत नाही किंवा त्यांच्याशी अधिकृत संबंध का करत नाहीत.

स्वामी यांचे हे वक्तव्य अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावर आले आहे. या भेटीमुळे चीन हादरला असून अमेरिकेला सतत धमक्या देत आहे. भारत आणि चीनमध्ये आधीच तणाव आहे. एप्रिल-मे 2020 पासून पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आलेत. चर्चेच्या 16 फेऱ्या होऊनही, तोडगा काढण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या काळात तिबेटशी संबंध बिघडले. 1952 मध्ये ल्हासा येथील डिप्लोमॅटिक मिशनचे वाणिज्य दूतावास जनरल असे करण्यात आले. तेही 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर बंद झाले. ल्हासा येथे वाणिज्य दूतावास सुरू करण्याची मागणी भारताने वारंवार केली, पण चीनने ते मान्य केले नाही. 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चीन दौऱ्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात तिबेटचे वर्णन चीनचा 'स्वायत्त प्रदेश' म्हणून करण्यात आले होते.

जून 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन दौऱ्यानंतर भारतानेही संयुक्त घोषणापत्रात तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता दिली होती. अनेक तज्ञांचे असे मत आहे की 2003 मध्येच भारताने तिबेटवरील चीनचे 'सार्वभौमत्व' मान्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com