Arvind Kejriwal : ''केजरीवालांनी इन्सुलिन मागितलंच नाही, डॉक्टरांचाही सल्ला नाही'', तिहार जेल प्रशासनाचं उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एम्सच्या सीनियर डायबिटॉलॉजिस्टच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कन्सल्टेशन दिलं गेलं. तब्बल ४० मिनिटं कन्सल्टेशननंतर डॉक्टरांकडून केजरीवालांना कुठलीही काळजीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून रविवारी करण्यात आला. मात्र तिहार जेल प्रशासनाचं वेगळंच काहीतरी म्हणणं समोर येत आहे.

मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आप नेते सौरभ भारद्वाज पत्रकारांशी बोलताना केली होती.

यावर तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एम्सच्या सीनियर डायबिटॉलॉजिस्टच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कन्सल्टेशन दिलं गेलं. तब्बल ४० मिनिटं कन्सल्टेशननंतर डॉक्टरांकडून केजरीवालांना कुठलीही काळजीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं. त्यांना ठाराविक औषधं सुरु ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असून जेल प्रशासन नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

सुनीता केजरीवाल यांच्या मागणीनंतर तिहार जेल प्रशासनाने व्हीसीच्या माध्यमातून केजरीवालांना डॉक्टरांकडून कन्सल्टेशन दिलं. एम्सचे सीनियर डायबिटीज स्पेशालिस्टसह आरएमओ तिहार आणि एमओ तिहार हेसुद्धा व्हीसीच्या वेळी उपस्थित होते. डॉक्टरांनी ग्लुकोज मॉनिटरिंग सेन्सरचं पूर्ण रेकॉर्ड आणि केजरीवालांचं जेवण आणि औषधांचा पूर्ण तपशील जाणून घेतला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी इन्सुलिनच्या मुद्द्यावर काहीच भाष्य केलं नाही. शिवाय डॉक्टरांनीही तसा सल्ला दिला नाही.

Arvind Kejriwal
Narendra Patil : 'शिंदेंच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावणार आणि उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार'

शुगर लेव्हल ३०० तरीही इन्सुलिन का दिलं जात नाही- आप

तिहार जेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपच्या सूत्रांनी सांगितलं की, तिहार जेल प्रशासनाने मान्य केलंय की २० दिवस केजरीवालांना डायबिटीच स्पेशालिस्टकडे दाखवलं नाही. जाणूनबुजून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांची शुगर लेव्हर ३०० आहे, तरी त्यांना इन्सुलिन का दिलं जात नाही?

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर आरोप केले होते. केंद्र सरकार अरविंद केजरीवालांची हत्या करण्याचा कट रचत आहे, असा आरोप त्यांनी लावला होता.

Arvind Kejriwal
Chinmay Mandlekar: "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून..."; मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध करुन द्या- सौरभ भारद्वाज

तिहार तुरुंगात सामान्य आजारांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. तेथे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर नसल्याचे तुरुंग प्रशासनाने एम्स रुग्णालयाला पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे, असं आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले.

''दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला इन्सुलिनपासून वंचित ठेवले जात आहे. केजरीवाल यांना वीस वर्षांपासून मधुमेह आहे तर मागील 12 वर्षांपासून ते इन्सुलिन घेत आहेत. दररोज ते 50 युनिट इन्सुलिन ते घेतात. सध्या त्यांना त्याची गरज आहे, मात्र त्यांना ते दिले जात नाही.'' असा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com