Nepal Plane Crash : 72 जणांचा मृत्यूतांडव; अपघातापूर्वीचा भयानक Video आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nepal Plane Accident

Nepal Plane Crash : 72 जणांचा मृत्यूतांडव; अपघातापूर्वीचा भयानक Video आला समोर

Nepal Aircraft Crash : नेपाळमध्ये रविवारी पोखरा विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात प्रवाशांसहित कर्मचाऱ्यांचा दुर्देवी अंत झाला. विमानात पाच भारतीय नागरिकांसह 72 जण होते. तर हा विमान अपघात होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अपघातग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला आहे. भारतातील गाझीपूर येथून या विमानाने टेक ऑफ केले होते. त्यानंतर या प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला होता.

त्यानंतर काही क्षणातंच विमान दुर्घटना घडली आणि विमानात असलेल्या 72 जणांचा यामध्ये दुर्देवी अंत झाला आहे. प्रवाशाने शूट केलेला हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विमानतळावर उतरताना विमान कोसळले

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) सांगितले की, हे विमान यति एअरलाइनचे होते. विमानाने सकाळी 10.33 वाजता काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर विमान कोसळले. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा सामावेश आहे.

टॅग्स :accidentplaneviral video