नेताजींच्या मृत्यूचे गूढ; जपानमधील अस्थींच्या डीएनए चाचणीची मागणी

netaji subhash chandra bose family wants dna test of bones kept in Japan Photo Source : thenewsminute.com
netaji subhash chandra bose family wants dna test of bones kept in Japan Photo Source : thenewsminute.com

कोलकता : थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाचे गूढ उकलण्यासाठी जपानमधील रेनकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थींची डीएनए चाचणी करावी आणि तीन गोपनीय फायली प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी नेताजींच्या कुटुंबीयांनी जपान सरकारकडे केली आहे.

जपानमध्ये नेताजींच्या अस्थी?
दुसऱ्या महायुद्धादरम्यान तैवानमधील विमान अपघातानंतर नेताजी बेपत्ता झाल्याचा काहींचा दावा असून, या अपघातात त्यांचा गंभीररीत्या भाजून मृत्यू झाल्याचा आणि जपानमधील रेणकोजी मंदिरात त्यांच्या अस्थी जतन करून ठेवल्याचाही दावा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानांकडे डीएनए चाचणीसाठी विनंती करावी, अशी इच्छा नेताजींचे पणतू चंद्रा बोस यांनी व्यक्त केली आहे. नेताजींच्या कन्या अनिता यांनी डीएनए चाचणीसाठी केलेल्या याचिकेला चंद्रा बोस यांच्यासह नेताजींच्या कुटुंबातील 35 जणांनी समर्थन दिले आहे. नेताजींचा तैवानमध्ये मृत्यू झाल्याच्या दाव्यावरून कुटुंबामध्ये मतभिन्नता होती. कुटुंबातील बहुतांशी जणांनी नेताजींचा 17 ऑगस्ट 1945 ला विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगणाऱ्या शाह नवाज समिती (1956) आणि खोसला आयोग (1971) यांचे अहवाल अमान्य केले होते. चंद्रा बोस यांच्या दाव्यानुसार, नेताजी हे 17 ऑगस्ट 1945 ला जिवंतच होते. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला की त्यांची हत्या केली गेली, हे जपान सरकारने त्यांच्याकडील तीन गोपनीय फायली प्रसिद्ध केल्यावरच उघडकीस येईल.

उद्धव ठाकरेंनी बोलवली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक 

तैवानमध्ये मृत्यू झाला?
वरील दोन्ही अहवालांनुसार, नेताजींच्या विमानाला तैवानमधील विमानतळावरच अपघात होऊन त्याला आग लागली आणि या आगीत गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा लष्करी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 2005 च्या न्या. मनोजकुमार मुखर्जी आयोगाने मात्र नेताजींचा मृत्यू तैवानमध्ये झाल्याचे अमान्य केले आहे. नेताजी हे चीनमार्गे रशियाला निसटल्याचे सांगणारेही काही अहवाल आहेत. मात्र, यातील दाव्यांना ठोस पुरावा नाही. नेताजींच्या बेपत्ता होण्यावर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुमनामी बाबा या चित्रपटानंतर मात्र अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या. नेताजी अपघातातून वाचून नंतर साठच्या दशकात परत आले आणि फैजाबाद येथे गुमनामी बाबा या रूपात एका झोपडीत 1985 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत रहात होते, असा काहींचा दावा आहे. 

रशियातही पुरावे 
नेताजींच्या कार्याच्या अभ्यासक आणि संशोधक पूरबी रॉय यांनी नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे अमान्य केले आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर नेताजी रशियात गेले होते, असा रॉय यांचा दावा आहे. 1946 मध्ये रशियातील पॉलिटब्युरोमध्ये आणि 1956 मध्ये रशियाच्या संसदेत नेताजींवर चर्चा झाली होती. या चर्चेची नोंद असलेली कागदपत्रे मॉस्कोतील संग्रहालयात आहेत, असे पूरबी रॉय यांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com