‘संन्यासी देशोनायक’वर बोस कुटुंबीयांचा आक्षेप

न्यायालयात जाण्याचा इशारा: फायद्यासाठी नेताजींच्या नावाचा वापर केल्याचा आरोप
Netaji Subhash Chandra Bose movie
Netaji Subhash Chandra Bose movie sakal

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ‘संन्यासी देशोनायक’ या बंगाली चित्रपटावर बोस कुटुंबीयांमधील काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा केवळ फायद्यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता. ते १९५० मध्ये भारतात आले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी अज्ञातवासात राहून अखेर ते फैजाबादमध्ये ‘गुमनामी बाबा’ या नावाने राहात होते, असा एक मतप्रवाह आहे. संन्यासी देशोनायक’ चित्रपटाचे कथानकही त्यावर बेतलेले आह. बोस कुटुंबीयांतील काही सदस्यांचा यावर आक्षेप आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मनोज मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मुखर्जी आयोग नेमलेला होता. या आयोगाने २००५मध्ये केंद्राला अहवाल देखील सादर केला होता. मनोज मुखर्जी यांच्याशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चित्रपट बनवला असल्याचा दावा चित्रपटाचे निर्माते अमलम कुसुम घोष यांनी केला आहे.

गुमनामी बाबाचे गूढ

नेताजींचे नातू अभिजित रॉय म्हणाले की, नेताजी बोस यांचा मृत्यू जपानमधील तायहोकू विमानतळावर कोणत्याही विमान अपघातात झाला नव्हता, असे मत निवृत्त न्यायाधीश मनोज मुखर्जी यांनी अहवालात मांडले आहे. पण गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस असा उल्लेखही कुठे केलेला नाही.

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ शोधण्यासाठी वेळोवेळी नेमण्यात आलेल्या ११ समित्यांच्या अहवालांची कागदपत्रे र्सावजनिक करण्यात आली आहेत. त्यापैकी दहा समित्यांच्या अहवालात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे म्हटले असल्याने, याबाबत आता कोणतीही शंका उरलेली नाही.

- चंद्रकुमार बोस, सुभाषचंद्र बोस यांचे नातू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com