सोनम कपूर, मग तू जा ना पाकिस्तानमध्येच...!

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मी, सिंधी असल्यासोबतच पेशावरीसुद्धा आहे.

नवी दिल्लीः अभिनेत्री सोनम कपूर हिने कलम 370 हटवल्यानंतर केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिला पाकिस्तानचा रस्ता दाखवत तिकडेच पाहायला जाण्याचा सल्ला दिला आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. मात्र, सोनम कपूर हिने एका मुलाखतीदरम्यान काश्मीरबाबत सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतु मी खूप देशभक्त आहे, असे म्हणाली. यामुळे नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदररम्यान सोनम म्हणाली, 'माझ्यासाठी सध्या शांत राहणेच योग्य आहे. कारण हा काळ सुद्धा निघून जाईल. आपला देश 70 वर्षांपूर्वी एकसंध होता आणि सध्याचे विभाजनशील राजकारण पाहून मन हेलावून जात आहे. सध्या हे प्रकरण फार गुंतागुंतीचे आहे असून, मला त्यातले फार काही माहीत नाही. कारण सगळीकडे इतक्या विरोधी बातम्या आहेत की सत्य काय हेच मला कळत नाही. सध्याच्या परिस्थितीत शांतता ठेवणे आणि काय घडतेय हे पाहणे यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे पूर्ण माहिती असेल तेव्हाच मी यावर मत मांडू शकेन.'

कुटुंबाचे नातं पाकिस्तानशी कसे जोडले गेले यावर बोलताना सोनम म्हणाली, 'मी, सिंधी असल्यासोबतच पेशावरीसुद्धा आहे.' मात्र, सोनमच्या या विधानावर नेटिझन्सनी टिका सुरू केली असून, तिला ट्रोल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens troll Sonam Kapoor for her half Sindhi half Peshawari