Amit Shah: न्यायव्यवस्था आता अधिक न्यायकेंद्रित; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
New Criminal Laws: अमित शहा यांनी जयपूरमध्ये सांगितले की, तीन नवीन फौजदारी कायद्यांमुळे भारतीय न्यायव्यवस्था शिक्षेऐवजी न्यायकेंद्रित होईल. हे कायदे नागरिकांना वेळेवर न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहेत.
जयपूर : देशात तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी ही २१व्या शतकातील भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेतील सर्वांत मोठी आणि ऐतिहासिक सुधारणा आहे. या कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री स्वरूप मिळाले आहे.