New Delhi : राजधानी दिल्ली हिल स्टेशनपेक्षा थंड!

मैदानी राज्यांमध्ये थंडीची लाट
New Delhi
New DelhiSakal

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात थंडीची पहिली तीव्र लाट आली आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात( सोमवार आणि मंगळवारी सकाळी आठ पर्यंत) दिल्लीचे किमान तापमान 7.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. पर्वतांची राणी, असे ब्रिटिशकालीन संबोधन लाभलेल्या शिमला येथे याच काळात दिल्लीपेक्षा जास्त म्हणजे 8.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पारा शून्य अंशांच्या खाली घसरला आहे.

पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावाचा भर बराचसा ओसरल्यानंतर आता थंडीचे दमदार आगमन झाले आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह उत्तर भारतात बहुतेक सर्व राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली आहे.

दिल्लीमध्ये दिवसभर विशेषतः संध्याकाळ दाट धुक्याचे साम्राज्य असते. दिल्लीच्या विविध भागांमध्ये विशेषतः यमुनेच्या पलीकडील पूर्व दिल्लीच्या भागात रात्रीपासून पहाटेपर्यंत ठिकठिकाणी पेटलेल्या “शेकोट्या” या गोरगरिबांसह पदपथावरील फेरीवाले, आणि निराधारांना आधार ठरत आहेत.

आज सकाळी अमृतसरचे किमान तापमान ७.२ अंश, जम्मूचे किमान तापमान ९.८, तर श्रीनगरचे तापमान उणे १.८ अंश सेल्सिअस होते.हिमाचलमधील सर्वात कमी तापमान कीलॉंगमध्ये नोंदवण्यात आले. येथील किमान तापमान उणे ४.१ अंश सेल्सिअस होते. तर सुंदरकल्पामध्ये किमान तापमान १.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज म्हणजे मंगळवारी, सकाळपासून दिवसभर दिल्ली आणि आसपास ढगाळ आकाश आणि धुके राहण्याचा अंदाज आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 8 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.दरम्यान पूर्व मध्य प्रदेशातही थंडीची लाट कायम आहे. रविवारी राज्यात 18 ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com