मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएए संदर्भात भूमिका केली स्पष्ट

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांना महाराष्ट्रासाठी केंद्राकडून लागणारी हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवी दिल्ली : मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. आज, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविषयी आपली भूमिकाही स्पष्ट केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांना महाराष्ट्रासाठी केंद्राकडून लागणारी हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे. केंद्राच्या सीएए आणि एनआरसी कायद्या संदर्भात संभ्रम असला तरी, त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. या कायद्यातील कलमांचा विचार केला तर, अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आता त्यात काही अडचणीचं ठरलं तर वाद होऊ शकतो.' पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी जाणार असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये सीएए आणि एनआरसीविषयी चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात पहिल्यांदाच एखाद्या वादाच्या विषयावर चर्चा होणार आहे. 

देशातील इतर घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

उद्धव ठाकरे म्हणाले 

  • महाराष्ट्रातील पिक विम्याच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा, दहा जिल्ह्यांत कंपन्या येण्यास तयार नाहीत
  • किमान समान कार्यक्रमाच्या आधारे राज्यातील सरकार काम करेल 
  • राज्यात जीएसटीचे पैसे येत आहेत, आवश्यक गतीने येत नाहीत 
  • काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्यामुळेच महाराष्ट्रात शांतता
  • सीएए, एनआरसी कायद्यातील कलमं समजून घेतल्यानंतर विरोध मावळेल
  • सीएए, एनआरसी कायद्याला घाबरण्याची गरज नाही 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi cm uddhav thackeray press conference meeting with pm narendra modi