Delhi News : आता कुत्रा चावला तर मालकाला होणार १० हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Delhi

Delhi News : आता कुत्रा चावला तर मालकाला होणार १० हजारांचा दंड

नवी दिल्ली : जर तुम्ही दिल्लीजवळच्या नोएडामध्ये राहात असाल, तुम्हाला कुत्रे-मांजरी किंवा पाळीव प्राणी पाळण्याचा नाद असेल आणि तुम्ही थोडासाही निष्काळजीपणा केला तर तुम्हाला कुत्रा पाळणे चांगलेच महागात जाऊ शकते. 1 मार्च 2023 पासून नोएडात तुम्ही पाळलेला प्राणी कोणाला चावला तर तुम्हाला जागीच १० हजार रूपयांचा दंड भरावा लागेल व ज्याला कुत्रा चावला त्यांच्या ुपचाराचा खर्चही तुम्हालाच उचलावा लागेल.

अनेकांच्या पाळीव प्राण्यांचा शेजाऱयांना किंवा आसपाच्या नागरिकांना होणारा उपद्रव हा नेहमीचा वाद असतो. मात्र नोएडा प्राधिकरणाने अशा उपद्रवी पाळीव प्राण्यांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून पाळीव प्राण्याने एखाद्याला चावा घेतल्यास मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच जखमी व्यक्तीच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही त्याला करावा लागणार आहे.

नोएडा भागातील गृहनिर्माण सोसायटींमध्ये पाळीव प्राण्यांनी नागरिकांवर हल्ले करून त्यांना चावे घेतल्याच्या वाढत्या घटनांबाबत नोएडा प्राधिकरणाकडे असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्राधिकरणाने या मुद्यावर कठोर भूमिका घेतली आहे . प्राधिकरणाने आपल्या 207 व्या बोर्ड बैठकीत पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. नोएडामध्ये पाळीव प्राणी आणि भटके प्राणी चावण्याच्या घटनांबाबत अनेक सोसायट्यांमध्ये भांडणे व माऱयामारीपर्यंत प्रकरणे गेली आहेत. या पार्श्वभूमीवर नेएडा प्राधिकरणाने याबाबत अनेक धोरणे आखली आहेत.

नवीन नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांमुळे होणारी घाण साफ करण्याची जबाबदारी प्राणी चालकाची असेल. पाळीव प्राण्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास जनावराच्या मालकाला 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि जखमी व्यक्तीच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही तो उचलेल असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.

टॅग्स :delhiDogStray Dogs