Manish Tiwari : अमेरिकेच्या तळासाठी भारताच्या भूमीचा वापर?

भारत-अमेरिका संयुक्त निवेदनावर काँग्रेसचा आक्षेप
manish tiwari
manish tiwarisakal

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या द्वीपक्षीय चर्चेनंतर जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातील काही मुद्यांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या निवेदनातील एका मुद्याने भारताच्या भूमीचा वापर अमेरिकेच्या संरक्षण तळासारखा उपयोग होईल काय, अशी शंका व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, या संयुक्त निवेदनाच्या प्रती सरकारने अधिकृतपणे जाहीर केल्या. यातील १८ व्या परिच्छेदावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आक्षेप घेतला आहे. संयुक्त निवेदनातील अठराव्या परिच्छेदाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गेल्या जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर जाहीर झालेल्या संयुक्त निवेदनातील १४ व्या परिच्छेदामध्ये या प्रकारची तरतूद केलेली आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलासाठी भारताची भूमी एक तळ म्हणून उपयोग होण्याची ही संभाव्य धोका आहे काय? असा सवाल तिवारी यांनी केला आहे. यासंदर्भात भाजप आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांनी स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

अमेरिका-‘माझगाव डॉक’मध्ये करार

अध्यक्ष ज्यो बायडेन व पंतप्रधान मोदी यांनी मोठे जहाज दुरुस्तीसाठी अमेरिकेचे नौदल व भारतातील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात करार झाला असून त्याचे स्वागत करण्यात आले आहे.

यातून दोन्ही देशांनी अमेरिकेच्या नौदलाची मालमत्ता इतर युद्धविमाने व पाणबुडीच्या डागडुजी व दुरुस्तीचे हब करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र भारताच्या भूमीचा वापर अमेरिकेसाठी होण्याचा धोका असल्याची शंका माजी मंत्री मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकी सैनिकांना भारतीय भूमीवर लष्करी तळ उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे की नाही हे त्यांनी संसदेत स्पष्ट करायला हवे.

- मनीष तिवारी, काँग्रेस नेते.

राष्ट्रपतींच्या भोजनाला पटनाईक गैरहजर

भुवनेश्‍वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० परिषदेच्या पाहुण्यांसाठी शनिवारी रात्री आयोजित विशेष भोजनाला गैरहजेरी लावली. दुपारीच सरकारी सूत्राकडून पटनाईक यांच्या अनुपस्थितीबाबत कळविण्यात आले होते. या गैरहजेरीमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना, सरकारी सचिवांना, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील इंडिया ट्रेड ऑर्गनायजेशनच्या सभागृहात रात्रीच्या भोजनासाठी निमंत्रित केले होते. मात्र ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे सूत्राने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com