हवाई सुंदरीचे काम यापुढेही करणार : स्वाती

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

नवी दिल्लीः भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली. आपले वडील देशातील सर्वोच्चपदी विराजमान झाले असले तरी, मी सध्या करीत असलेले हवाई सुंदरीचे काम यापुढेही करण्याची इच्छा कोविंद यांची कन्या स्वाती यांनी व्यक्त केली.

स्वाती या "एअर इंडिया'त हवाई सुंदरी आहेत. दिल्लीतील केंद्रीय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. लेडी श्रीराम महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. कुटुंबाच्या आडनावाचा वापर त्या करीत नाहीत. ""माझे वडील त्यांच्या कामामुळे या पदावर पोचले आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असा सल्ला वडील कायम आम्हाला देत असत. यामुळेच कुटुंबातील सर्व सदस्य आज स्वतःच्या पायावर उभे असून, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Web Title: new delhi news air hostess swati kovind and ramnath kovind