दहशतवाद्यांना संपवा, मग परदेशांत फिरा: प्रवीण तोगडिया

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जुलै 2017

नवी दिल्ली: "अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या पाशवी हल्ल्यामुळे काश्‍मिरी मुस्लिम दहशतवाद्यांशी लढण्याची केंद्र सरकारची इच्छाशक्तीच संपल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी काश्‍मिरातील दहशतवाद्यांविरुद्ध शौर्य दाखवावे, नंतर परदेशांत हवे तेथे फिरावे,' अशा शब्दांत विश्‍व हिंदू परिषदेने आज केंद्र सरकारवर हल्ला चढविला. काश्‍मिरी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार घालण्याचे आवाहन करतानाच केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्ती सरकार बरखास्त करावे व काश्‍मीर लष्कराच्या ताब्यात द्यावे, अशी जोरदार मागणी विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली.

दहशतवाद्यांवर "कार्पेट बॉंबिंग' करण्याची मुभा लष्करास द्यावी, अशी मागणी तोगडिया यांनी केली. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विहिंप उद्या (ता. 12) जंतरमंतरसह देशभरात आंदोलन करणार आहे. ते म्हणाले, काश्‍मिरातील दहशतवाद्यांबाबत मवाळ असलेले मेहबूबा सरकार केंद्राने जम्मू-काश्‍मीरची सत्ता लालसा सोडून त्वरित बरखास्त करावे. विहिंपने दोनच दिवासंपूर्वी मेहबूबा यांची भेट घेऊन अमरनाथ यात्रेचा नकाशा व यात्रेकरूंच्या जिवाला धोका असल्याचे त्यांना सांगितले होते. पण त्या निष्क्रिय राहिल्या असा आरोप सुरेंद्र जैन यांनी केला.

इस्लामी दहशतवाद खणून काढण्याची भाषा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण देऊन तोगडिया म्हणाले, की भारत सरकारने तुष्टीकरणाचे धोरण थांबवून मुस्लिम जिहादींना नोकऱ्या व कर्जे देणे तातडीने थांबवावे. मारले गेलेले अमरनाथ यात्रेकरू नोंदणी न करता गेल्याच्या सरकारच्या सारवासारवीवर टीका करताना ते म्हणाले, की केंद्र सरकारने शब्दांचे खेळ न करता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडावे; अन्यथा काश्‍मीरच नव्हे सारा देशच ते गिळंकृत करतील. काश्‍मिरी तरुण हे वाट चुकलेले नाहीत. तेथील स्थानिक काश्‍मिरी दहशतवाद्यांच्या बाजूने उभे रहातात त्यामुळे त्यांची सफरचंदे, शाली, आक्रोड, केशर आदी वस्तूंवर देशव्यापी बहिष्कार टाकावा.

पूर्ण वेळ संरक्षणमंत्री नेमा!
संरक्षण मंत्रिपदाची सूत्रे असलेल्या अरुण जेटली यांच्यावरील संघपरिवाराचा राग नवा नाही. तोगडिया यांनी हाच राग पुन्हा आळविताना, देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नेमावेत अशी मागणी केली. सव्वाशे कोटी जनतेतून चांगला संरक्षणमंत्री भारताला नक्कीच मिळेल. असे संरक्षणमंत्री देशातील मुस्लिम दहशतवादाला वेसण घालण्यास समर्थ व कणखर असतील, असा टोला त्यांनी जेटली यांचे नाव न घेता लगावला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news amarnath yatra attack narendra modi and pravin togadia