शाळकरी मुलांवरील गोळीबार अयोग्य; भारताने पाकला सुनावले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी दिल्ली: जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रणरेषेवरील शाळकरी मुलांवर होत असलेला गोळीबार आणि नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याच्या मुद्‌द्‌यांवरून भारताने आज पाकिस्तानचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शाळकरी मुलांवर गोळीबार करणे हे कोणत्याही लष्करासाठी योग्य नसल्याचे पाकला सुनावले.

लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान पाकने त्यांच्या लष्कराला नियंत्रणात ठेवावे तसेच नीच कृत्यांपासून रोखावे, असे सांगितल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने गुरुवारी दिली.
शाळकरी मुलांना लक्ष्य करणे हे कोणत्याही लष्करासाठी अशोभनीय बाब आहे. एक व्यावसायिक दल म्हणून भारतीय लष्कर नागरिकांना लक्ष्य करण्याचे टाळत आहे आणि पाकिस्तानी लष्कराकडूनही अशीच अपेक्षा असल्याचे भट्ट यांनी मिर्झा यांना सांगितले. लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमान आनंद यांनी ही माहिती दिली.

पाकचा कांगावा सुरूच
भारताकडून शस्त्रसंधीचा भंग होत असल्याचा कांगावा सुरूच ठेवत पाकिस्तानने दोन दिवसांत दुसऱ्यांदा भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंह यांना समन्स बजावले. भारतीय लष्कराने नियंत्रणरेषेवर केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार आणि पाच जण जखमी झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. सार्कचे महासंचालक महंमद फैजल यांनी समन्स बजावताना शस्त्रसंधी भंगाचा निषेध केला. पाकने कालही समन्स बजावले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news india and pakistan firing case and student