

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री झालेल्या भयानक चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत १० महिला, ४ पुरुष आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.