esakal | New Delhi : ‘रुपेरी’ जिल्हाधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

suhas

New Delhi : ‘रुपेरी’ जिल्हाधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील गौतम बुद्घनगर (नोएडा) येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या सुहास यथिराजने बॅडमिंटन एकेरीच्या ‘एसएल ४’ गटात अंतिम फेरीत धडक मारत ऐतिहासिक कामगिरी केली होती. शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरने सुहासला २१-१५, १७-२१, १५-२१ असे पराभूत केले; त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पहिला गेम २१-१५ अशा फरकाने जिंकणाऱ्या सुहासने पुढील दोन्ही सेटमध्येही अटीतटीची झुंज दिली; परंतु दोन्ही सेट त्याला थोडक्यात गमवावे लागले. पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून अशी कामगिरी करणारा भारतातील पहिलाच जिल्हाधिकारी होण्याचा पराक्रम त्याने केला.

मूळचा कर्नाटकमधील हसारचा रहिवासी असणाऱ्या सुहासचे वडीलही सरकारी अधिकारी. त्यामुळे लहानपणीच त्याला सरकारी सेवेचे बाळकडू मिळाले. संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर २००७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सुहास जिल्हाधिकारीपदावर विराजमान झाला होता.

मी आज अत्यंत भावुक आहे. मी कधीही एवढा निराश आणि तितकाच आनंदी झालेलो नाही. सुवर्णपदक हुकल्याची निराशा तर रौप्यपदकाचा आनंद, अशी संमिश्र मनःस्थिती माझी झाली आहे.

- सुहास यथिराज

loading image
go to top