
नवी दिल्ली, ता. ७ : गेल्या तीन महिन्यांत दोनवेळा मुख्यमंत्री निवासस्थानातून मला बाहेर काढण्यात आल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
गरज पडली तर आपण लोकांच्या घरात जाऊन राहू, पण दिल्लीच्या हिताची कामे करणे थांबवणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. मंत्री सौरभ भारद्वाज, खासदार संजय सिंह यावेळी उपस्थित होते.