
‘एनईपी’मुळे भारत ज्ञानवंताचा देश बनेल : अमित शहा
बंगळूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) शिक्षणात अमुलाग्र बदल घडविणारे असून, या शैक्षणिक धोरणाने भारत ज्ञानवंताचा देश बनेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडले.नृपतुंग विद्यापीठ आवारात विद्यापीठ उद्घाटन व शैक्षणिक समुदाय भवनाचा कोनशिला समारंभ आज (ता.३) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. देशात २३० पेक्षा अधिक विद्यापीठ केंद्राने स्थापले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथे नृपतुंग विद्यापीठ उदयास आले आहे, त्याचाच भाग आहे.
विद्यापीठाला राष्ट्रकुटाचे प्रसिध्द राजा नृपतुंग यांचे नाव दिले आहे. त्याबद्दल आनंद वाटतो. विद्यापीठाचे नाव विज्ञान विद्यापीठ होत. ते आता नृपतुंग विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल. अक्षय तृतियदिनी विद्यापीठाचे उद्घाटन झाले आहे, हे चांगले संकेत आहेत, असेही शहा यांनी सांगितले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जारी केले. केजी ते पीजीपर्यंत नवीन बदल घडणार आहेत. नवीन बदलला विरोध झाला. पण, काळ थांबत नाही. नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून अंमलबजावणी करणारे पहिले नृपतुंग विद्यापीठ ठरल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र, उच्च शिक्षण मंत्री डॉ. आश्वत्थ नारायण, खासदार पी. सी. मोहन, डीजीपी प्रवीण सूद उपस्थित होते.
Web Title: New National Education Make India Country Knowledge Inauguration Of Nrupatung University Amit Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..