esakal | आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; १५ पट अधिक आक्रमक असल्याचा दावा

बोलून बातमी शोधा

corona update
आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; १५ पट अधिक आक्रमक असल्याचा दावा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या उद्रेकानं कहर केलेला असताना आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) आणखी एक नवा व्हेरियंट (new veriant) आढळून आला आहे. याचं नामकरण एपी स्ट्रेन (AP Strain) असं आहे. वैज्ञानिकांच्या मते, हा व्हेरियंट १५ पट अधिक संक्रमणकारक आहे. या विषाणूची लागण झाल्यास लोक तीन-चार दिवसांतच आजारी पडत आहेत. (New strain of coronavirus found in Andhra Pradesh Claims to be 15 times more aggressive)

या नव्या स्ट्रेनच्या आक्रमकतेमुळं सर्वजण काळजीत आहेत. देशात अद्याप डबल म्युटेंट व्हायरस (double mutaint virus) निश्चित झाला आहे. हा स्ट्रेन युके आणि दक्षिण अफ्रिकेचा आहे. त्यानंतर आता आंध्र प्रदेशमध्ये आढळून आलेल्या एपी स्ट्रेनला वैज्ञानिक भाषेत N440K व्हेरियंट बोललं जात आहे. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (CCMB) च्या वैज्ञानिकांनी हा व्हेरियंट शोधून काढला आहे.

आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात शोधण्यात आला व्हेरियंट

माध्यमातील वृत्तांनुसार, एपी स्ट्रेनला व्हेरियंटला आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात आढळून आला आहे. जो B1.617 आणि B1.618 व्हेरियंटहून अधिक ताकदवान आणि खतरनाक असल्याचं सांगण्यात येत आहे. विशाखापट्टनमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, CCMB मध्ये अनेक व्हेरियंट्सची तपासणी केली जात आहे. कोणता व्हेरियंट किती खतरनाक आहे याची माहिती वैज्ञानिकच देतील. सध्या या नव्या व्हेरियंटचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

तीन ते चार दिवसांत लोक पडताहेत आजारी

सुत्रांच्या माहितीनुसार, नवा एपी स्ट्रेन इतका खतरनाक आहे की, यामुळे लोक तीन-चार दिवसांत आजारी पडत आहेत. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास रुग्णाची हालत गंभीर बनते. हा स्ट्रेन मोठ्या वेगानं पसरत असून जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करत आहे.