Palamu Tiger: पलामू व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाची एन्ट्री; तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट

New Tiger Enters Palamu Tiger Reserve High Alert Issued: नव्या T07 नर वाघाच्या उपस्थितीने पलामू व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धनाला नवे बळ; तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात सतत गस्त, ट्रॅप कॅमेरे व अतिरिक्त वनरक्षक तैनात करून मानवी वस्तीत प्रवेश रोखण्याचे प्रयत्न
Tiger Spotted In Palamu Tiger Reserve Sparks High Alert Across Three District Border Areas In Jharkhand

Tiger Spotted In Palamu Tiger Reserve Sparks High Alert Across Three District Border Areas In Jharkhand

sakal

Updated on

झारखंडमधील एकमेव संरक्षित व्याघ्र प्रकल्प असलेल्या पलामू व्याघ्र प्रकल्पात (PTR) एका नवीन प्रौढ वाघाचा वावर आढळून आला आहे. जंगलात वाघाच्या पावलांचे ठसे आणि सातत्याने होत असलेल्या जनावरांच्या शिकारीमुळे वन विभाग सतर्क झाला आहे. पलामू, गढवा आणि लातेहार या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून वाघाच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. पलामू व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रजेशकांत जेना यांनी नवीन प्रौढ वाघाच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com