सुरू होताच संसाराचा शेवट, फोटोशूटसाठी गेलेल्या नवरदेवाचा मृत्यू

Groom Died During Photoshoot Kerala
Groom Died During Photoshoot KeralaGoogle
Updated on

धुमधडाक्यात लग्न झाले. नववधू सासरी गेली. पण, लग्नाचा आनंद जास्त काळ टीकू शकला नाही. अवघ्या १५ दिवसांत संसाराचा शेवट झाला. नदीच्या पाण्यात पडून पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी अत्यावस्थ आहे. केरळमधील कोझिकोड (Kozhikode Kerala) येथील कुट्टियाडीपुझ्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. (Groom Died During Photoshoot Kerala)

Groom Died During Photoshoot Kerala
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नववधूचा मृत्यू, तरीही दिलं चौघांना जीवदान

रेजिल, असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचं नुकतंच १४ मार्चला लग्न झाले होते. नव्या संसाराला सुरुवात होऊन १५ दिवस झाले. त्यानंतर त्यांनी फोटोशूटसाठी जायचं ठरवलं. ते दोघेही कुट्टियाडी येथील जानकीकाडुपुझा येथील नदीच्या किनाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी गेले. फोटोशूट करताना रेजिलचा पाय दगडावरून घसरला. त्याच्यासोबत नववधू देखील पाण्यात पडली. जानकीपुझा या नदीमध्ये यापूर्वी अनेकांचे अपघात झाले आहेत. रेजिल येथील रहिवासी असल्यानं त्याला या गोष्टींची माहिती होती. तरीही ते दोघं फोटोशूटसाठी या नदीवर गेले होते.

स्थानिकांनी नदीत उडी घेत दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पाण्याबाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी रेजिलला मृत घोषित केले. त्याची पत्नी सध्या अत्यावस्थ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ज्या घरातून लग्नाची वरात निघाली होती, आज त्याच मुलाची अंत्ययात्रा निघाल्याने आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तसेच तरुण मुलगा गमावल्याने गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com