Kisan Andolan: तारीख ठरली! मोदी सरकारला घाम फोडणारे शेतकरी आंदोलन पुन्हा दिल्लीत धडकणार!

पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होणार
Kisan Andolan 2
Kisan Andolan 2esakal

गेल्या वर्षी देशातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ धरणे आंदोलन केल्याने सरकारला नमते घ्यावे लागले होते. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होणार आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील किसान महापंचायतीनंतर 20 मार्च रोजी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकऱ्यांचे निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, पुढील वर्षी 26 जानेवारीला दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर परेड होणार आहे.

Kisan Andolan 2
Accident News: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी

मुझफ्फरपूरच्या GIC मैदानावर भारतीय किसान युनियनच्या महापंचायतीत हजारो शेतकरी जमले. किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी यूपीच्या योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बाकी देणे, भूसंपादन, एमएसपी आदी प्रश्नांवर जोरदार भाषणबाजी व चर्चा झाली. यानंतर 20 मार्चपासून दिल्लीत पुन्हा आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली.

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेडची योजना

राकेश टिकैत म्हणाले, 'आमच्या आंदोलनाचा पुढचा मुक्काम दिल्लीत असेल. 20 मार्चपासून संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

आम्ही 20 वर्षे आंदोलन करण्यास तयार आहोत. पुढील वर्षी 26 जानेवारीला देशभरात ट्रॅक्टर परेड काढण्यात येणार आहे. आम्ही कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही.

Kisan Andolan 2
Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून खुली ऑफर

शेतकरी आंदोलन पुन्हा का सुरु होत आहे?

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी आंदोलनाचा चेहरा राकेश टिकैत यांनी सांगितले की, यूपीमधील कूपनलिकांवर वीज मीटर कोणत्याही परिस्थितीत बसू दिले जाणार नाहीत.

ते म्हणाले की, सरकार PAC बोलवू शकते, मिलिटरी बोलवू शकते, पण मीटर बसवणार नाही. चुकीच्या पद्धतीने भूसंपादन होत आहे, जुने ट्रॅक्टर बंद केले जात आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चर्चा होत नसल्याचेही राकेश टिकैत म्हणाले.

गेल्या वेळी तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर अनेक किलोमीटरपर्यंत तंबू ठोकले होते. शेवटी, सरकारला त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागले आणि एमएसपीवर एक समिती स्थापन करण्यात आली.

मात्र, सरकारने अनेक आश्वासने खोटी ठरवली असून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com