ड्रायव्हरला डुलकी लागली आणि भीषण अपघातात 14 जणांनी गमावला जीव

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

प्रतापगडचे पोलिस अधिक्षक अनुराग आर्य यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. वाहन चालवत असलेल्या चालकाला (ड्रायव्हर) डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतापगड अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. लखनऊ-प्रयागराज महामार्गावर गुरुवारी रात्री उशीराने झालेल्या अपघातात 14 जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त असून यात 5 बालकांचा समावेश असल्याची पृष्टी झालीय. लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी जाणारी बोलेरो रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर धडकली.

प्रतापगडचे पोलिस अधिक्षक अनुराग आर्य यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. वाहन चालवत असलेल्या चालकाला (ड्रायव्हर) डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतापगड अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील नबाबगंज परिसरातील शेखापूरहून लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून ही मंडळी घरी परतत होती. गुरुवारी मध्यरात्री जवळपास 1च्या सुमारास लखनऊ-प्रयागराज महामार्गावर वेगाने असलेली बोलेलो रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यात 14 जणांना मृत्यू झाला असून 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, घटनेची माहिती मिळताच पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up news major accident in pratapgarh district bolero truck collide 14 baratis killed