मित्राकडे मदत मागणे युवतीला पडले महागात! दोघांनी केला सामूहिक अत्याचार | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मित्राकडे मदत मागणे युवतीला पडले महागात! दोघांकडून सामूहिक अत्याचार
मित्राकडे मदत मागणे युवतीला पडले महागात! दोघांनी केला सामूहिक अत्याचार

मित्राकडे मदत मागणे युवतीला पडले महागात! दोघांकडून सामूहिक अत्याचार

हरियाणातील (Haryana) गुरुग्राममध्ये (Gurugram) एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला मित्राकडून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये (Hotel) जाणे महागात पडले. दोन मित्रांनी त्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतौडी पोलिस ठाण्यात (Pataudi Police Station) एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. (News of two criminal incidents in Gurugram, Haryana)

हेही वाचा: मुकेश अंबानींच्या कंपनीत कमाईची संधी! येतोय Reliance Jio चा IPO

मूळ रेवाडी (Rewari) येथील एका 22 वर्षीय तरुणीने शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, पतौडी येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला ती आधीपासूनच ओळखत होती. तिने काही पैसे मागण्यासाठी तरुणाला फोन केला होता. यावर तरुणाने त्या तरुणीला पतौडी येथे येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तरुणाकडून पैसे घेण्यासाठी ती पतौडीला पोहोचली. तो तरुण आपल्या मित्रासोबत कारमध्ये आला आणि त्या तरुणीला कारमध्ये बसवून पतौडी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्या दोन्ही मित्रांनी तरुणीवर सामूहिक अत्यात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.

हेही वाचा: कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष

विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

रेवाडी जिल्ह्यातील मीरपूर गावात 20 वर्षीय बी. फार्माच्या विद्यार्थिनी अंजली पतौडी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या विद्यार्थिनीने दोन दिवसांपूर्वी डोकेदुखीच्या गोळीऐवजी सल्फासची गोळी घेतली होती, त्यानंतर तिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे शनिवारी तिचा मृत्यू झाला. मीरपूर चौकी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मीरपूरची रहिवासी असलेली 20 वर्षीय अंजली पतौडी येथील एका कॉलेजमध्ये बी. फार्माची विद्यार्थिनी होती. दोन दिवसांपूर्वी तिने डोके दुखत असल्याने चुकून सल्फासची गोळी घेतली होती, त्यानंतर तिची प्रकृती खालावली होती.

Web Title: News Of Two Criminal Incidents In Gurugram Haryana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top