NewsClick प्रकरणाला नवे वळण; HR विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

न्यूज क्लिकचे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेवर चीन समर्थनार्थ प्रोपेगेंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 NewsClick case Accused HR head  Amit Chakravarty
NewsClick case Accused HR head Amit Chakravarty

नवी दिल्ली- न्यूज क्लिकचे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेवर चीन समर्थनार्थ प्रोपेगेंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांच्यावर यूएपीए अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (NewsClick case Accused HR head Amit Chakravarty moves court to become government witness)

चक्रवर्ती यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केलीये. याप्रकरणी माफी मिळावी आणि माझ्याकडे यासंबंधी महत्त्वाची माहिती असून ती मी दिल्ली पोलिसांना सांगण्यास तयार आहे, असं चक्रवर्ती अर्जामध्ये म्हणाले आहेत. कोर्टाने दंडाधिकारी न्यायालयाला चक्रवर्ती यांची साक्ष नोंदवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

 NewsClick case Accused HR head  Amit Chakravarty
NewsClick Terror Case: न्यूजक्लिक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अमेरिकन लक्षाधीश 'सिंघम'ला समन्स! काय आहे प्रकरण?

१ ऑक्टोंबर रोजी दिल्ली पोलिसांनी चक्रवर्ती आणि प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी कोर्टाने दोन आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. न्यूजक्लिकला कोणाकडून निधी मिळाला याबाबत सक्तवसुली संचालनालयाने तपास केला होता. केंद्रीय यंत्रणाच्या इनपुटनुसार दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला होता.

 NewsClick case Accused HR head  Amit Chakravarty
Newsclick Case : काश्‍मीर, अरुणाचलला भारतात दाखविले नाही; न्यूजक्लिक प्रकरणी पोलिसांचा न्यायालयात आरोप

ऑगस्ट महिन्यामध्ये न्यूयॉर्क टाईम्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. यामध्ये न्यूजक्लिकला अमेरिकेन अब्जाधीश नेविल्ले रॉय सिंघम यांच्याकडून ३८ कोटी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. सिंघम यांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रोपेगेंडा कंपनीसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे.

एफआयआर नुसार, भारताचे सार्वभौमत्व खंडित करण्यासाठी न्यूजक्लिकला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. पुरकायस्थ यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियांमध्ये घातपाती कृत्य करण्यासाठी पिपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी आणि सेक्युलेरिझम (PADS) या संस्थेसोबत कट रचल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com