Jammu Bus Terror Attack: दहशतवादी हल्ल्याची ‘एनआयए’कडून होणार चौकशी; पथक रियासी येथे दाखल

Jammu Kashmir Terror Attack: या हल्ल्यामागील दहशवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनीही शोध मोहीम सुरू केली असून अनेक भाग ताब्यात घेण्यात आले आहेत.
NIA team reaches Jammu Kashmir to probe into Reasi Bus Terror Attack Latest Update
NIA team reaches Jammu Kashmir to probe into Reasi Bus Terror Attack Latest Update

नवी दिल्ली, ता.१० (पीटीआय) : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी (ता.९) सायंकाळी भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात नऊजण ठार झाले असून त्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक जम्मूला पोहोचले असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून तपास सुरू झाला आहे.


या हल्ल्यामागील दहशवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनीही शोध मोहीम सुरू केली असून अनेक भाग ताब्यात घेण्यात आले आहेत. शिवखोरी मंदिराहून कटरा येथील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी काल पोनी भागातील तीर्यत गावाजवळ गोळीबार केला.

यामुळे बस रस्त्यांच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. बसमधील भाविक उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथील होते. या हल्ल्यात नऊ भाविक ठार झाले. राजस्थानमधील दोन वर्षांचे बालक आणि उत्तर प्रदेशमधील १४ वर्षांच्या मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच तीन ते ५० वर्षे वयाचे ४१ जण जखणी झाले आहेत. त्यातील दहाजणांना गोळ्या लागल्याने इजा झाली आहे.

NIA team reaches Jammu Kashmir to probe into Reasi Bus Terror Attack Latest Update
Bypolls : लोकसभेनंतर आता सात राज्यात विधानसभेची रणधुमाळी! 'या' 13 जागांसाठी 10 जुलैला होणार पोटनिवडणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com