निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपीनं जीव वाचवण्यासाठी दाखल केली क्युरेटिव्ह याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना  22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले.

दिल्ली :निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे.

निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना  22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत. आता निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पहिली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. मुकेश व विनयचे वकील ए. पी. सिंह यांनी आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे आधीच सांगितले होते.

या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी न्यायालयानं दिला होता. निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यानं २२ जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवून मेरठहून जल्लाद मागवला आहे.

निर्भया प्रकरण ः
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

डेथ वॉरंट म्हणजे काय :
कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं की कोर्टाला फाशीची तारीख आणि वेळ जाहीर करावी लागते. तसेच मधला काही काळ हा आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी भेटावं म्हणून दिलेला असतो. तसंच काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तरीही हा वेळ दिला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya rape case accused vinay sharma filed curative petition in supreme court update