Nirmala Sitharaman : विकासाला चालना देण्याचा प्रयत्न : निर्मला सीतारामन
Economic Growth : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना, खासगी गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.
नवी दिल्ली : खासगी गुंतवणूक व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केले.