पतीच्या शौर्याचा वारसा समर्थपणे पेलणारी लेफ्टनंट निकिता

पतीच्या शौर्याचा वारसा समर्थपणे पेलणारी लेफ्टनंट निकिता

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या वीरपत्नी निकिता कौल धौंडियाल यांनी आज इतिहास रचत देशाच्या लष्करी सेवेमध्ये प्रवेश केला. उत्तर आघाडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांच्या हस्ते निकिता यांना मानचिन्हे प्रदान करण्यात आल्यानंतर धौंडियाल कुटुंबातील सदस्यांचा उर अभिमानाने भरून आला होता.

पतीच्या शौर्याचा वारसा समर्थपणे पेलणारी लेफ्टनंट निकिता
लसपुरवठ्याचं ऑडिट करा; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांची मागणी
पतीच्या शौर्याचा वारसा समर्थपणे पेलणारी लेफ्टनंट निकिता
मोदींच्या बैठकीतून निघून गेल्याच्या आरोपावर ममतांचा पलटवार; म्हणाल्या...

तत्पूर्वी भारत सरकारनेही विभूती शंकर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. आज चेन्नईमधील अधिकारी प्रशिक्षण अकादमीतील पासिंग आउट परेडनंतर माध्यमांशी बोलताना निकिता म्हणाल्या, की ‘‘ ज्या प्रशिक्षणातून विभूती शंकर यांना जावे लागले होते तोच प्रवास मी देखील अनुभवला आहे.’’ पूलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर नऊ महिने आधीच निकिता आणि विभूती शंकर यांचा विवाह झाला होता. पूलवामातील हल्ल्यानंतर निकिता यांचे आयुष्यच बदलले. पण वीरपत्नी या नात्याने त्यांनी विभूती शंकर यांचे बलिदान वाया जाऊ दिले नाही. पतीच्या निधनानंतर त्यांनी लष्करी सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आज साकारही करून दाखविला.

परीक्षा उत्तीर्ण
पतीच्या निधनाला सहा महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच निकिता यांनी शॉर्ट सर्व्हिस आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा फॉर्म भरला. या परीक्षेमध्ये बाजी मारतानाच त्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी)च्या मुलाखतीचा टप्पाही यशस्वीपणे पार केला.

खडतर प्रशिक्षण
परीक्षा आणि मुलाखतीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर निकिता यांना चेन्नईमधील अधिकारी प्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय लष्करामध्ये सहभागी झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com