esakal | नव्या वर्षापासून गाड्यांना FASTag बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari5.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संबंधी मोठी घोषणा केली आहे

नव्या वर्षापासून गाड्यांना FASTag बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संबंधी मोठी घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व गाड्यांना FASTag बंधनकारक असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी कॅश पेमेंटसाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज लागणार नाही. तसेच वेळ आणि इंधन बचत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

देशात 2019 पासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’चा वापर सुरु करण्यात आला होता. आता 1 जानेवारी 2021 पासून सर्वच ठिकाणी याचा वापर सुरू करण्यात येईल. आता सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’द्वारेच टोल वसुली केली जाणार आहे. ‘फास्टॅग’गाड्यांसाठी एक-दोन लेन सोडून सर्वच राखीव असणार आहेत. त्यामुळे आता वाहनांच्या लांबलचक रांगा न दिसण्याची आशा आहे. 

एकूण टोलवसुलीत 75 टक्के वसुली ‘फास्टॅग’द्वारे होत असून देशात ‘फास्ट टॅग’ असलेल्या वाहनांचा आकडा २ कोटींपर्यंत गेला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेच टोलवसुली वाढली असल्याचं सांगण्यात आलं आहे. 
 

loading image
go to top