Nitin Gadkari: ‘अन्नदात्या’ला ऊर्जादाता बनवण्याची गरज : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; ग्रीन हायड्रोजन भारताचे भविष्य..
New Delhi : देशाला पेट्रोलियम आयातीवर तब्बल २२ लाख कोटी रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे. यातील १० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जावेत, असा प्रयत्न आहे.
नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांची आयात थांबवण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.