पेट्रोल, डिझेल वाहनांवरील बंदीवर गडकरी म्हणाले...

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

पेट्रोल-डिझेल गाड्यांवर केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची बंदी आणणार नाही. पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाला प्राप्त झाली मात्र केंद्र सरकारचा असा कोणताही विचार नाही.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे ठरविल्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांबाबत अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. यावर अखेर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की सरकारचे या वाहनांवर बंदी घालण्याचे कोणतेही धोरण नाही. 

आगामी काळात पेट्रोल, डिझेल वाहनांवर बंदी आणण्यात येईल अशी चर्चा सुरु झाल्या आहेत. फक्त इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर भर द्यावा अशा प्रकारच्या बातम्या पसरत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होते असे कारणही देण्यात येत आहे. त्यामुळे गडकरींनी यावर स्पष्टीकरण दिल्याने सध्यातरी पेट्रोल, डिझेल वाहनांबाबत संभ्रम दूर झाला आहे.

गडकरी म्हणाले, की पेट्रोल-डिझेल गाड्यांवर केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची बंदी आणणार नाही. पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाला प्राप्त झाली मात्र केंद्र सरकारचा असा कोणताही विचार नाही. आम्ही पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari clarification on petrol Diesel vehicles